सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण, कणकवलीतील ग्रामस्थांचा मोर्चा

07 Dec 2017 08:48 PM


मुंबई गोवा महामार्गाच्या कणकवलीतल्या प्रकल्पग्रस्तांनी आज शहर बंदची हाक दिली. सोबतच कणकवली उपविभागीय कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. चौपदरीकरणात कणकवलीतील विस्थापितांना विचारात घेण्यात आलेलं नाही आणि सोबतच जमिन संपादनाचा मोबदला अत्यंत कमी असल्याचा आरोप प्रकल्पबाधितांचा आहे. मूल्यांकन योग्य पद्धतीने न झाल्यास याचा व्यापारी वर्गालाही मोठा फटका बसेल आणि अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भिती व्यक्त होतेय. शासनाने या बाबीचा गांभीर्यानं विचार करण्याचं आवाहन आंदोलकांनी केलंय.

LATEST VIDEOS

LiveTV