रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळ्याजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात

11 Nov 2017 11:39 PM

मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून 4 जण जखमी झाले आहेत. ट्रेलर, सँट्रो कार आणि जीप ही तीन वाहनं एकमेकांना धडकली. लोखंडी पाईप वाहून नेणारा ट्रेलरची आणि सँट्रो कारची समोरसमोर धडक झाली. त्याचवेळेस मागून आलेली पीकजीप कारला धडकून पलटी झालीय. या अपघातात कारमधील एक महिला गंभीर जखमी झाली तर तीन जण किरकोळ दुखापत झाली. या अपघातामुळं दोन्ही बाजूकडची वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. 

LATEST VIDEOS

LiveTV