बिहार : बेगूसरायमध्ये गंगास्नानावेळी चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू

04 Nov 2017 11:45 PM

कार्तिक पौर्णिमेनिमित्त बिहारमधील बेगुसराय इथल्या घाटावर गंगास्नान करताना चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलांचा समावेश आहे.

त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त बेगुसरायच्या सिमरिया घाटावर आज पुजेसाठी आणि स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीमुळे गोंधळ उडाला. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्यात तीन वृद्ध महिलांचा बळी गेला. तर जखमींची संख्याही मोठी आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

LATEST VIDEOS

LiveTV