केरळ: कम्युनिस्ट पक्षाच्या बॅनरवर किम जोंग उन

20 Dec 2017 04:12 PM

केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) बॅनर्सवर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची छायाचित्र झळकल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. येथील इडुक्की जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रादेशिक स्तरावरील परिषदेच्या प्रचारासाठी हे बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र, ही परिषद संपून दोन दिवस उलटल्यानंतरही हे बॅनर्स तसेच ठेवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.
याबद्दल विचारणा केली असता इडुक्की येथील सीपीएमचे सचिव के.के. जयचंद्रन यांनी म्हटले की, किम जोंग उन हे अमेरिकेला आव्हान देणारे एकमेव साम्यवादी नेते असल्याची भावना आमच्या काही कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र, पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही.

LATEST VIDEOS

LiveTV