रायगड : 'घाटाचा राजा'च्या स्मरणार्थ खोपोली ते खंडाळा सायकल राईड

17 Dec 2017 12:00 PM

'घाटाचा राजा' अर्थात दिवंगत अशोक खळेंच्या स्मरणार्थ 'खोपोली ते खंडाळा' घाटात सायकल राईड आयोजित करण्यात आली आहे. या सायकल राईडला सकाळी सुरुवात झाली.

मुंबई-पुणे सायकल शर्यत गाजवणा-या आणि 'घाटाचा राजा' असा लौकिक असलेले सायकलपटू अशोक खळे यांचं काही दिवसांपूर्वीच सायकलिंग करताना टॅक्सीने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी 'खोपोली ते खंडाळा' घाटात सायकल राईडचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि राज्यातील इतर सायकलस्वार या राईडमध्ये सहभागी झाले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV