नवी मुंबई : खारघरमधील रिक्षा संघटनांमधील वाद चिघळण्याची शक्यता

06 Dec 2017 10:36 PMनवी मुंबईच्या खारघर मध्ये गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेला रीक्षाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. खारघर आणि तळोजा युनियनमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यात आरटीओला यश आलेलं नाही. रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्याच्या वादातून दोन रिक्षा युनियनमध्ये हाणामारी झाली. खारघरमधल्या ९०० रिक्षा यानंतर बंद होत्या. गेल्या अनेक वर्षापासून खारघर स्टेशनसमोरील स्टँन्डचे भाडे एकता युनियन सिडकोला भरत आहे. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त म्हणून आमचा अधिकार या रिक्षा स्टँन्डवर असल्याचा दावा खारघर एकता युनियनचा आहे. मागणी मान्य झाल्यास आमरण आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान वाद घालणाऱ्या रिक्षाचालकांचे परमिट रद्द करण्याचा इशारा आरटीओने दिलाय.या सगळ्या वादात प्रवासी मात्र नाहक भरडले जातायेत

LATEST VIDEOS

LiveTV