नवी मुंबई : खारघरमध्ये पान टपरीवाल्याला बेदम मारहाण, 6 जणांविरोधात गुन्हा

03 Dec 2017 11:27 PM

नवी मुंबईतल्या खारघरमध्ये एका पान टपरीवाल्याला बेदम मारहाण करण्यात आलीए... खारघर सेक्टर 13 मध्ये दोन दिवसापूर्वी ही घटना घडली. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकून सहा जण पान टपरीवाल्याला मारहाण करताना दिसतायत.  मात्र यामागचं कारण काय होतं, हे अद्याप कळू शकलेलं नाहीय. खारघर पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कुणावरही अटकेची कारवाई झालेली नाहीय. 

LATEST VIDEOS

LiveTV