कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील सीसीटीव्ही बंद करणं पुजाऱ्यांना महागात

27 Oct 2017 08:51 PM

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील सीसीटीव्ही परस्पर बंद केल्याने देवस्थान समितीतर्फे पुजाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली. सीसीटीव्हीचं नियंत्रण देवस्थान समितीकडे सीसीटीव्हीचं नियंत्रण असतानाही पुजाऱ्यांनी गुरुवारी 4 सीसीटीव्ही परस्पर बंद केलं. त्यामुळे तुम्ही मंदिराचे मालक नाहीत, देवस्थान समितीच्या कामात अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करु अशा शब्दात देवस्थान समितीनं पुजाऱ्यांना सुनावलं. दरम्यान यावेळी पुजारी हटाव समितीचे सदस्यही बैठकीच्या ठिकाणी आले. त्यांनी संबंधित पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

LATEST VIDEOS

LiveTV