कोल्हापुरात महानायक बीग बींचा वाढदिवस हटके पद्धतीनं साजरा

11 Oct 2017 10:42 PM

कोल्हापूरकरांनी आपल्या लाडक्या महानायकाचा अर्थात अमिताभ बच्चन यांचा 75 वा वाढदिवस हटके पद्धतीनं साजरा केला. आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये बच्चन वेडे गँगने बच्चन यांना शुभेच्छा दिल्या. बच्चन वेडे कोल्हापूर वॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्यांनी शिवाजी चौकात मोठ्ठा केक कापला, तर काहींनी साखर वाटून हा वाढदिवस साजरा केला. यावेळी या गँगने बच्चन यांची लोकप्रिय गाणी आणि संवादही सादर केले. या गँगमधील एका रिक्षा चालकानं तर आपल्या रिक्षावर अमिताभ बच्चन यांचे पोस्टर लावले होते. आणि ही रिक्षा दिवसभर कोल्हापुरातील चौका-चौकात तसेच रस्त्यांवर फिरवली.

LATEST VIDEOS

LiveTV