नवी मुंबई : अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी अभय कुरुंदकरांना कोठडी, घातपाताचा संशय

08 Dec 2017 09:51 PM

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना पनवेल कोर्टाकडून सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रेंसोबत घातपात केला असल्याची शक्यता पोलिसांनी कोर्टात मांडली.

अश्विनी गायब झाल्यानंतर अभय कुरुंदकर यांनी भाईंदर मधील घराचा रंग बदलला. रंग का बदलला, काही आक्षेपार्ह घटना घडली आहे का, याचा पोलिसांनी कोर्टासमोर संशय व्यक्त केला आहे. त्याचबरोबर घरातील रंग, भिंतीचे नमुने घेतले असून तपासणीसाठी पाठवल्याची माहिती कोर्टात देण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV