कोल्हापूर : स्वत:च्या घरात चिता रचून वृद्ध महिलेची आत्महत्या, बामणी गावातील धक्कादायक प्रकार

15 Nov 2017 10:36 AM

कोल्हापुरातल्या बामणी गावात राहत्या घरी वृद्धेने स्वतःची चिता रचून पेटवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय. कल्लावा दादू कांबळे या 90 वर्षीय वृद्धेचे नाव आहे. 13 तारखेला वृद्धेने घरात लाकूड शेण्या पेठवल्याने त्यात ती जळून खाक  झालीय. याबाबतची तक्रार विठ्ठल दादू कांबळे यांनी कागल पोलीस ठाण्यात दिलीय. वृद्धेने केलेल्या या प्रकारचे कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. 

LiveTV