कोल्हापूर पोटनिवडणूक : भाजप-ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर विजयी

12 Oct 2017 05:39 PM

कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क मतदार संघात झालेल्या पोट निवडणुकीत भाजपा - ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर २०० मतांनी विजयी झाले आहेत . त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रसचे शहर अध्यक्ष राजेश लाटकर यांचा पराभव केला. शिरोळकर यांना १३९९ तर लाटकर यांना ११९९ मते पडली. शिवसेना उमेदवार राज जाधव यांना अवघी ८० मते पडली.

LATEST VIDEOS

LiveTV