कोल्हापूर : पोलिस अधीक्षक कार्यालयात दाम्पत्याचा तीन मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न

17 Nov 2017 09:15 PM

कोल्हापुरच्या इचलकरंजीत एका महिलेनं पोलिस कार्यालयासमोरच पती आणि 3 मुलांसह स्वतला जाळून घेण्याचा प्रयत्न केला...पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुनही पोलिसांनी दखल न घेतल्यानं शफिका शिकलगार या महिलेनं हे कृत्य केलं...मात्र पोलिसांनी वेळीच रोखल्यानं दुर्घटना टळली...सासरकडच्या 4 ते 5 जणांनी पतीसह आपल्याला मारहाण केल्याचा आरोप महिलेनं केलाय...मात्र मारहाण करणाऱ्यांनीच आमच्याविरोधात खोटी तक्रार दाखल करुन मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचं महिलेचं म्हणणंय..याविरोधात तक्रारही दाखल केली...मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानं हा प्रकार घडला

LATEST VIDEOS

LiveTV