कोल्हापूर : गोकुळमधील वर्चस्वावरुन सतेज पाटील-धनंजय महाडिक आमनेसामने

07 Dec 2017 11:06 PM

काँग्रेस नेते सतेज पाटील हे मनोरुग्ण असून, त्यांनी गोकुळची बदनामी केल्याचा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे...
कोल्हापुरातल्या वर्चस्वावरुन सुरु झालेल्या राजकीय लढ्याचा दुसरा अंक आज कोल्हापुरातल्या रस्त्यांवर बघायला मिळाला... कारण काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आज खासदार धनंज महाडिक यांनी मोर्चा काढला... या मोर्चामध्ये सतेज पाटील यांना बोक्याची उपमा देण्यात आली...
दुसरीकडे सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महाडिक काका-पुतण्यांचा समाचार घेतला... दोघेजण मिळून सभासदांचा पैसा लुटत असल्याचा दावाही पाटील यांनी केला....
साडे पाच लाख सभासद, 2 हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या गोकुळवर वर्चस्वासाठी दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चढाओढ लागलेली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV