कोल्हापूर : मंगळवारी मध्यरात्री 2 गटात तुफान हाणामारी, गाड्यांचं नुकसान, 15 जणांवर गुन्हा

14 Dec 2017 07:36 PM

कोल्हापुरात तरुणांच्या 2 गटात मंगळवारी मध्यरात्री तुफान राडा पाहायला मिळाला. तलवारी, कोयते, काठ्या हातात घेऊन तरुणांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हाती लागलेल्या सीसीटीव्हीत काही जण गाड्यांची तोडफोड आणि दगडफेक करताना दिसतायेत. या राड्यानंतर 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अभिजित सावंत आणि संकेत मुरकुटे या दोघांमध्ये मुलीच्या कारणावरुन काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. यानंतर मंगळवारी रात्री हा वाद टोकाला गेला. यामध्ये झालेल्या तोडफोडीत नागरिकांचं मोठं नुकसान झालंय.

LATEST VIDEOS

LiveTV