कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये रंगली म्हशी पळवण्याची आगळीवेगळी स्पर्धा

13 Dec 2017 10:03 PM

आजवर तुम्ही घोड्यांच्या शर्यती, बैलगाड्यांच्या शर्यती पाहिल्या असतील. पण कोल्हापुरातल्या गडहिंग्लजमध्ये म्हशी पळवण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.
मालकांनी मोटरसायकलीवर स्वार व्हायचं आणि त्यांच्या मागे म्हशींना पळवायचं. असं स्पर्धेचं स्वरुप होतं. संतोष शिंदे या उद्योजकाने पशूधनावरच्या प्रेमापोटी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
मुऱ्हा म्हैस, पंढरपुरी म्हैस आणि देशी म्हैस असे म्हशींचे गट होते. आपल्या मालकाने दिलेल्या हाकेवरून कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त अंतर कापणाऱ्या म्हशीला विजेतेपद देण्यात आलं. या स्पर्धेत कोल्हापूर, बेळगाव, सांगली, साताऱ्यातल्या स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत हजारो रुपयांची बक्षीसेही देण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV