कोल्हापूर : गोकुळचा शेतकऱ्यांना झटका, गायीच्या दूध खरेदीदरात 2 रुपयांची कपात!

01 Nov 2017 11:24 AM

गोकुळ दूध संघाने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला आणखी खाईत लोटण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळने आजपासून गाईच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात केली आहे. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

पूर्वी 28 रुपये 50 पैशांनी खरेदी केलं जाणारं गायीचं दूध आता 26 रुपये 50 पैसे होणार आहे.

अतिरिक्त दुधात वाढ झाल्यामुळे खरेदी दरात कपात करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

लोणी आणि गाईच्या दुधाची पावडर स्वस्त झाली आहे. 225 रू किलोची पावडर 170 रु किलोपर्यंत घसरली आहे. तर लोणी 400 प्रती किलो वरून 275 रु प्रति किलो एवढ्या खाली आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV