स्पेशल रिपोर्ट : 'गोकुळ'मधील वर्चस्वावरुन बंटी-मुन्ना आमने-सामने

08 Dec 2017 12:06 AM

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्याविरोधात गोकुळ दूध संघाचे १ लाख दूध उत्पादक आज मोर्चा काढणार असल्याचा दावा, राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. या मोर्चाचं नेतृत्त्व स्वत: धनंजय महाडिक करणार आहेत.

गेल्या काही दिवसात गोकुळ दूध संघावर बेछूट आरोप करुन सतेज पाटलांनी गोकुळची बदनामी केल्याचा आरोप धनंजय महाडिक यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

राज्यामध्ये नव्हे, तर देशामध्ये अव्वल असणारा गोकुळ दूध संघ हा जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. आठ दिवसाला कोट्यवधी रुपये सभासदांना देऊन हजारो संसार फुलविणा-या संस्थेची बदनामी थांबवा. तथ्य नसणारे आरोप थांबवावेत, अशी मागणी मोर्चाद्वारे केली जाणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV