कोल्हापूर : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाच्या सौद्यांना प्रारंभ

20 Oct 2017 03:06 PM

दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर कोल्हापूरात गुळाच्या सौद्यांना आज प्रारंभ झाला. प्रतिक्विंटल 5000 ते 5600 रुपये इतका दर गुळाला मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर 1200 ते 1500 रुपये जास्त आहे. मिळालेल्या दरामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. हा दर असाच टिकून राहावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV