कोल्हापूर : विचारवंतांचे मारेकरी का सापडत नाही?: कन्हैया कुमार

09 Nov 2017 08:48 AM

जेएनयूच्या विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार यानं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी उमा पानसरे उपस्थित होत्या. कॉ.गोविंद पानसरे यांची हत्या झालेल्या घटनास्थळीही कन्हैया कुमारने भेट दिली. यावेळी कन्हैया कुमारच्या संरक्षणासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेल्या तीन वर्षात देशात चार विचारवंतांच्या हत्या झाल्या आहेत, त्यातील एकही आरोपी का सापडला जात नाही असा सवाल कन्हैया कुमारने उपस्थित केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV