कोल्हापूर : ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि कारखानदारांची बैठक

28 Dec 2017 01:03 PM

राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि साखर कारखानदार यांच्यात आज एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. साखर दरातील घसरणीमुळे ऊसाच्या एफआरपीवरुन कारखानदार आणि शेतकरी चिंतेत पडला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. ऊसदर तोडग्यानंतर सर्वाधिक दर जाहीर करण्यासाठी कारखानदारांमध्ये लागलेली इर्षा अडचणीची झाली आहे. यावर या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. 

LiveTV