कोल्हापूर : नांगरे-पाटील, अक्षय कुमारची शहीदांच्या कुटुंबीयांना दिवाळी भेट

21 Oct 2017 01:33 PM

कोल्हापुरातील पोलिसांनी शहीदांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या कल्पनेतून ही दिवाळी साजरी करण्यात आली. ज्यांच्या घरातील वडील किंवा मुलगा शहीद झाले आहेत त्या 103 शहीदांची यादी तयार करुन त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. ही गोष्ट बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला कळाल्यावर त्यानेही या उपक्रमात पुढाकार घेतला आणि शहीदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा चेक आणि एक शुभेच्छा पत्र पाठवलं.

LATEST VIDEOS

LiveTV