कोल्हापूर : पुजारी हटाव समितीच्यावतीने अंबाबाईचा जागर

22 Dec 2017 09:24 PM

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचं दिलेलं आश्वासन पूर्ण न झाल्यानं पुजारी हटाव कृती समितीनं भर चौकात अंबाबाईचा जागर करत गोंधळ घातला.. हातात संबळ, टाळ आणि दिवटे घेत हा गोंधळ घालण्यात आला...हिवाळी अधिवेशनादरम्यान आश्वासन पूर्ण करण्याची हमी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली होती...मात्र अधिवेशन संपत आलं तरीही पुजारी नेमणुकीविषयी कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आली नाबी...तसंच शासनानं याची दखल न घेतल्यास मंत्रालयावर अंबाबाई भक्त डोकेफोड आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला...

LATEST VIDEOS

LiveTV