कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर खासगी बसला आग

24 Nov 2017 08:45 AM

कोल्हापुरात आत्माराम ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला असून 16 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.

गगनबावडा मार्गावरील लोंघे गावाच्या हद्दीत पहाटे 4.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. आत्माराम ट्रॅव्हल्स ही बस गोव्यावरुन कोल्हापूर-पुणे मार्गे मुंबईला होती निघाली.

LATEST VIDEOS

LiveTV