कोल्हापूर/सांगली : स्वाभिमानी संघटनेने ऊसाचे ट्रॅक्टर अडवले

02 Nov 2017 01:51 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुन्हा एकदा उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवण्यात आले आहेत. कोल्हापुरातील कोरोचीहून कर्नाटकातील साखर कारखान्यात हे ट्रॅक्टर जात होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उसाचे 10 ट्रॅक्टर अडवले. ऊसाला 3 हजार 400 चा भाव मिळावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. ज्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलनं करण्यात येत आहेत. तर तिकडे सांगलीत वसंतदादा साखर कारखान्याचे उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची हवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV