कोल्हापूर : विद्यार्थीनीला 500 उठाबशांची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेला अटक

14 Dec 2017 03:33 PM

गृहपाठ केला नाही म्हणून विद्यार्थिनीला 500 उठाबशा काढायला लावणाऱ्या मुख्याध्यापिकेला चंदगड पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कानूरमधील भावेश्वरी विद्यालयात शिकणाऱ्या विजया चौगुले हीला गृहपाठ केला नाही म्हणून मुख्याध्यापिका अश्विनी देवाण यांनी 500 उठाबशा काढायची शिक्षा दिली. विजयाने 300 उठाबशा काढल्यानंतर ती जमिनीवर कोसळली. विजयावर सध्या उपचार सुरु असून तिला उभं राहण्यासाठी आधार घ्यावा लागतो आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV