कोल्हापुरातील अपहृत चिमुरड्याचा मृतदेह आढळला

07 Nov 2017 09:42 PM

कोल्हापुरात अपहरण झालेल्या तिसरीतील चिमुरड्याची हत्या झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. रंकाळा तलावातील पतौडी खाणीतल्या पाण्यात प्रदीप सुतारचा मृतदेह सापडला.

कोल्हापुरातील कळे पोलिसांनी केलेल्या तपासात ही हत्येची घटना उघडकीस आली. तिसरीत शिकणाऱ्या चिमुरड्या प्रदीपचं अपहरण करण्यात आलं होतं. मात्र अपहरणकर्त्यांनी त्याचा जीव घेतल्याचंही स्पष्ट झालं आहे.

प्रदीपच्या हत्येप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र खुनाचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

LATEST VIDEOS

LiveTV