कोल्हापूर: गरज पडल्यास सत्तेला लाथ मारेन : उद्धव ठाकरे

24 Nov 2017 05:39 PM

मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी खिशातले राजीनामे बाहेर काढण्याचं धाडस न दाखवणाऱ्या शिवसेनेनं, पुन्हा एकदा सत्ता सोडण्याची भाषा केलीय. गरज पडली तर सत्तेला लाथ मारून तुमच्यासोबत येईन असा शब्द उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलाय. कोल्हापुरातल्या शेतकरी मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिनोळीमधल्या शिवपुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांमध्ये काल झालेल्या बैठकीचा खरपूस समाचार घेतला

LATEST VIDEOS

LiveTV