मुंबई : ओखी वादळामुळे कोकणात आंब्याचं मोठं नुकसान, मनमाडमध्येही कापूस भिजला

06 Dec 2017 09:51 PM

गुजरातच्या दिशेनं सरकलेलं ओखी वादळानं मुंबईला जरी कुठलाही धोका पोहोचवला नसला तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीचं मोठं नुकसान केलं. सोसाट्याच्या वाऱ्यानं आंबा पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं बागायतदारांना मोठा फटका बसला. वाऱ्याने आंबा बागेत आलेल्या मोहोराची आणि कैरीची मोठी गळ झाली आहे. तिकडे मनमाडमध्ये कापूस आणि कांद्याच्या पिकांना मोठा फटका बसलाय. शेतकऱ्यांनी शेतातला काढून ठेवलेला कांदा पाण्यात भिजल्याने त्याचा दर्जा घसरला शिवाय कांदा खराब झाला, हीच परिस्थिती कापसाची असून आधीच बोंडआळीच्या प्रार्दुभावामुळे शेतकरी संकटात असताना हाती येणारा कापूस पाण्याने भिजल्याने तो काळा पडणार. पावसामुळे डहाणू, वाणगांव, चिंचणी या भागात हजारो हेक्टर जमीन मिरची लागवडी खाली आहे. पाऊस पडल्याने मिरचीची शेती पाण्याखाली गेली असून मिरचीची रोपं जमीनदोस्त झाली आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV