आंध्रमध्ये कृष्णा नदीत प्रवासी बोट पलटली, 26 जण बुडाले!

13 Nov 2017 12:00 AM

आंध्र प्रदेशमधील विजयवाड्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीमध्ये प्रवासी बोट पलटली. या दुर्घटनेत 26 जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.

संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कृष्णा आणि गोदावरी नदीचं संगम जिथे होतं, त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. 38 प्रवाशांना घेऊन ही बोट भवानी बेटावरुन पवित्र संगम घाटाकडे निघाली होती.

आतापर्यंत 16 लोकांचे मृतदेह शोधण्यात आले आहेत. इतर मृतदेहांचा शोध सुरु आहे.

LATEST VIDEOS

LiveTV