नवी दिल्ली : पाकिस्तानकडून कुलभूषण जाधवांना आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी

08 Dec 2017 09:33 PM

तब्बल दीड वर्षांनंतर कुलभूषण जाधव आपल्या आई आणि पत्नीला भेटू शकणार आहेत. पाकिस्तान सरकारनं कुलभूषणच्या आई आणि पत्नीला कुलभूषणच्या भेटीची परवानगी दिली आहे. कुलभूषण जाधव हे 25 मार्च, 2016 पासून आंतरराष्ट्रीय हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच 25 डिसेंबरला कुलभूषण जाधव आपल्या आई आणि पत्नीला भेटू शकणार आहेत तरी, भारताकडून पाकिस्तानला कुलभूषणच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची हमीही घेण्यात आली.
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर आक्षेप घेत भारतानं जागतिक न्यायालयात याचिका दाखल केली आणि जागतिक न्यायालयानं कुलभूषणच्या फाशीचा निर्णय स्थगित करण्याचा निकाल दिला.

LATEST VIDEOS

LiveTV