कोलकाता : ईडन गार्डन्सवर लकमलची लकाकी, 6 षटकं, 6 निर्धाव, 3 विकेट्स

16 Nov 2017 05:54 PM

कोलकात्याच्या पहिल्या कसोटीत पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे केवळ अकरा षटकं आणि पाच चेंडूंचाच खेळ होऊ शकला. पण त्या कालावधीतही श्रीलंकेने टीम इंडियाची तीन बाद 17 अशी दाणादाण उडवली आहे.

श्रीलंकेच्या लकमलने लखाखती कामगिरी केली. 6 षटकांमध्ये 6 निर्धाव आणि 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आजच्या दिवसाचा लकमल हिरो ठरला.

लोकेश राहुल, शिखर धवन आणि विराट कोहली या तिन्ही फलंदाजांना लकमलने एकही धाव न मोजता माघारी धाडलं. त्याचं पृथक्करण होतं सहा षटकं, सहा निर्धाव, एकही धाव न देता तीन विकेट्स.

LATEST VIDEOS

LiveTV