जम्मू काश्मीर : दहशतवादाला 'किक' मारुन काश्मीरच्या फुटबॉलपटूचं आठवडाभरात समर्पण

17 Nov 2017 08:48 PM

दहशतवादी संघटनेत सामील झालेला काश्मीरचा फुटबॉलपटू माजिद इरशाद खानने गुरुवारी रात्री 11.30 वाजता आत्मसमर्पण केलं. तीन दिवसांपूर्वी माजिद लष्कर-ए-तोयबा या संघटनेत सामील झाला होता. सध्या तो अवंतीपोरामध्ये व्हिक्टर फोर्सच्या ताब्यात आहे.

जिल्हास्तरीय फुटबॉलपटू असलेला माजिद मूळचा अनंतनागचा रहिवासी आहे. 20 वर्षीय फुटबॉलपटू माजिद इरशाद खान ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याच्या या निर्णयामुळे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांच्या पायाखालून जमीनच सरकली होती.

माजिदचे कुटुंबीय आणि मित्रांनी त्याला शरण येण्यासाठी दबाव टाकला. त्याच्यासाठी सोशल मीडियाद्वारे काश्मीर खोऱ्यात मोठी मोहीम सुरु होती. अखेर त्याने स्वत:च दक्षिण काश्मीरचे पोलिस उपमहानिरीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलं.

LATEST VIDEOS

LiveTV