लातूर : देवणीमध्ये बलात्कार पीडित मुलीला शाळेत प्रवेश नाकारला, पोलिसांचीही लाचखोरी

28 Nov 2017 12:27 PM

बलात्कार पीडित मुलीला शाळेत प्रवेश नाकारण्याचा निंदनीय प्रकार लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात घडला. चार महिन्यांपूर्वी सैन्यात असलेल्या एका युवकानं लग्नाचं आमिष दाखवून मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर तो पुन्हा आपल्या कामावर रुजू झाला. मात्र या घटनेननंतर मुलीची आई तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसात गेली. यावेळी पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी शरीरसुखाची मागणी करत 50 हजार मागितल्याचा आरोप मुलीच्या आईने केला.
या सगळ्या प्रकारानंतर मुलगी शाळेत आली तर शाळेची बदनामी होईल या भीतीनं शाळेनंही तिच्यासाठी दरवाजे बंद केलेत.
त्यामुळे तक्रार नाकारणारे पोलीस आणि शाळेवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थांनी केलीय.

LATEST VIDEOS

LiveTV