लिअँडर पेस आणि पूरव राजाला नाक्सविले चॅलेंजर विजेतेपद

13 Nov 2017 10:18 PM

भारताच्या लिअँडर पेस आमि पूरव राजा या जोडीनं आंतरराष्ट्रीय टेनिसमधल्या पुरुष दुहेरीच्या पहिल्यावहिल्या विजेतेपदाची कमाई केली आहे. पेस आणि राजानं जेम्स सेरेटनी आणि जॉन-पॅट्रिक स्मिथचं कडवं आव्हान मोडीत काढून नॉक्सविले चॅलेंजर करंडकावर आपलं नाव कोरलं. पेस आणि राजाला पुरुष दुहेरीत अव्वल मानांकन देण्यात आलं होतं. त्यांनी सेरेटनी आणि स्मिथवर ७-६, ७-६ असा संघर्षपूर्ण विजय साजरा केला. लिअँडर पेसचं हे यंदाच्या मोसमातलं चौथं चॅलेंजर विजेतेपद ठरलं.

LATEST VIDEOS

LiveTV