कमला मिल्स कंपाऊंड आग : 31 डिसेंबरच्या तोंडावर अनाधिकृत हॉटेलवरील कारवाई पालिकेने थांबवली?

31 Dec 2017 12:06 PM

चौफेर टीका झाल्यानंतर काल मुंबई महापालिकेनं कमला मिलसह अनेक भागातल्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि पबच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवला. मात्र आज अद्यापपर्यंत एकही कारवाई झालेली नाही. 31 डिसेंबरमुळे आज कारवाई होणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जाते आहे. सर्व अनधिकृत बांधकामांची एक यादीच महापालिकेनं तयार केली. आणि ती यादी पूर्ण केल्यानंतरच ही मोहिम थांबवण्यात येईल, असंही महापालिकेनं स्पष्ट केलं. मात्र आज कारवाईला ब्रेक का लागला याचं कारण कळू शकलेलं नाही. शुक्रवारी कमला मिलमध्ये आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला. इथल्या पब आणि हॉटेलमध्ये लागलेल्या आगीमुळं ही दुर्घटना घडली. इथल्या हॉटेल मालकांनी अनधिकृत बांधकाम करुन हॉटेलचा विस्तार वाढवला होता. शिवाय आग भडकू नये, यासाठी कोणतेही सुरक्षात्मक उपाय अंमलात आणलेले नव्हते.

LATEST VIDEOS

LiveTV