लखनौ : डासना जेलमधील डेंटल हॉस्पिटलला आरुषी तलवारचं नाव

19 Oct 2017 03:09 PM

डासना जेलमधील दंतवैद्यकीय हॉस्पिटलला आरुषी तलवारचं नाव देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारनं घेतला आहे. आरुषी तलवारच्या हत्येनंतर तिचे आईवडील नुपूर आणि राजेश तलवारना याच तुरुंगात ठेवलं होतं. तुरुंगातील वास्तव्यादरम्यान त्यांनी शेकडो कैद्यांवर मोफत उपचार केले होते. या हॉस्पिटलला आपल्या मुलीचं नाव देण्याची इच्छा तलवार दाम्पत्यानं व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेला मान देऊन या डेंटल हॉस्पिटलचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं उत्तर प्रदेशचे मंत्री जयकुमार जैकी यांनी सांगितलं.

LATEST VIDEOS

LiveTV