स्पेशल रिपोर्ट : सातारा : दुष्काळी दिवाळीची सवय असणाऱ्या माण तालुक्यात पाणीदार दिवाळी

21 Oct 2017 08:33 PM

सातारा, सांगली आणि सोलापुर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला माण देश नेहमीच दुष्काळासाठी ओळखला जातो. व्यंकटेश माडगुळकरांनी बनगरवाडी कादंबरीतून माणदेशच्या दुष्काळाची भीषणता सर्वांसमोर मांडली. मात्र आता माण देश बदलतो आहे. जलसंधारणाच महत्त्व पटलेल्या माणदेशाने माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून कायम दुष्काळी प्रदेश ही आपली ओळख पुसण्यास सुरुवात केली आहे.

LiveTV