मध्य प्रदेश : काँग्रेस खासदारावर सुरक्षारक्षकाने दोन वेळा रायफल रोखली!

16 Dec 2017 10:54 AM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यावर त्यांच्याच सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसाने दोन वेळा रायफल रोखल्याची घटना काल घडली. मात्र बाजूलाच असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने रायफल रोखणाऱ्या पोलिसाला बाजूला सारलं आणि मोठा अनर्थ टळला. राहुल गांधी आज काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्या कार्यक्रमासाठी कमलनाथ मध्यप्रदेशच्या छिंदवाडा विमानतळावरुन दिल्लीला निघाले होते. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने दोन वेळा रायफल ताणली.

LiveTV