सातारा : पर्यटकांच्या गर्दीमुळे वाई-महाबळेश्वर मार्गावरुन 2 दिवस एकेरी वाहतूक

31 Dec 2017 10:51 PM

31 डिसेंबरचं सेलिब्रेशन करण्यासाठी महाबळेश्वरसारख्या ठिकाणीही पर्यटकांची मोठी गर्दी दिसतेय.. पर्यटकांची हीच गर्दी लक्षात घेता वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षकांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय.. त्यानुसार सातारा- वाई ते महाबळेश्वर हा मार्ग एकेरी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे परतीच्या प्रवाशांसाठी मेढा ते सातारा मार्गे प्रवास करावा लागणार आहे.. त्यामुळे प्रवाशांना परतीच्या प्रवासात १५- २० किमी जास्तीचा वेढा पडेल. 31 डिसेंबर ते 1 जानेवारी  म्हणजेच आज आणि उद्यासाठी निर्णय घेण्यात आलाय.

LATEST VIDEOS

LiveTV