मुंबई : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियम

30 Nov 2017 10:12 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दहावीची परीक्षा 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 दरम्यान, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 दरम्यान होणार आहे. परंतु वेळापत्रकासह बोर्डाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियमही जारी केले आहेत. परीक्षेला यायला एक मिनिटही उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना खोलीत प्रवेश मिळणार नाही. तसंच परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना खोलीतच बसून राहावं लागणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV