मुंबई : फडणवीसांवर टीका करणारं ट्वीट, भाजपची सायबर सेलकडे तक्रार

03 Dec 2017 08:33 PM

भाजपच्या ट्विटर हँडलवरुन कोणतंही ट्वीट केलं नसताना सरकारविषयी आक्षेपार्ह ट्वीट प्रसिद्ध होण्याचा प्रकार नेमका कशामुळे झाला, नेमकी छेडछाड कशी झाली किंवा हँडल हॅक झालं का, याची चौकशी करण्याची मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे एका तक्रारीच्या माध्यमातून केली आहे.

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत हीन दर्जाचा प्रचार विरोधकांकडून होत असताना ट्विटर अकाऊण्टशी कुठे छेडछाड तर झाली नाही ना, असा संशय भाजपने व्यक्त केला आहे. भाजपच्या ट्विटर हँडलचा दुरुपयोग करण्यात आला असून ते हॅक झाल्याची शक्यता भाजपने वर्तवली आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी तक्रार भाजपच्या वतीने सायबर विभागाकडे करण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV