सोलापूर : सलगच्या तीन सुट्ट्यांमुळे कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास विलंब : सुभाष देशमुख

23 Oct 2017 10:06 AM

आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. दिवाळीच्या सलगच्या 3 सुट्ट्यामुळे कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा झाले नसल्याचं सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजपासून कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल, असं सुभाष देशमुख म्हणाले. सोलापुरात एबीपी माझाशी बोलताना देशमुखांनी कर्जमाफीसंदर्भात सविस्तर माहिती दिली.

LATEST VIDEOS

LiveTV