मुंबई : 24, 25, 31 डिसेंबरला बार आणि पब्स पहाटेपर्यंत खुले

22 Dec 2017 11:51 AM

नाताळ आणि नववर्षानिमित्त मुंबईतील हॉटेल, बार आणि पब्स उशिरापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.  24, 25 आणि 31 डिसेंबरला बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत, तर वाईन शॉप रात्री 1 पर्यंत खुले राहणार आहेत. गृह खात्याने एक्साईज विभागाशी चर्चा करुन गुरुवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. इतर वेळी रात्री दीड वाजेपर्यंत सुरु राहणारी हॉटेल्स, बार आणि पब्स 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तर रात्री साडेदहा वाजेपर्यंत वाईन शॉप्सना एक वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV