मुंबई : 'पानिपत'कारांवर 'झोपु' घोटाळ्याचा ठपका, चौकशी अहवाल सादर!

30 Nov 2017 12:12 PM

माजी सनदी अधिकारी आणि झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे प्रमुख विश्वास पाटील चांगलेच गोत्यात येणार असं दिसतंय.
कारण झोपु योजनेचं काम बघतांना त्यांनी खासगी विकासकांना नियम, कायदे धाब्यावर बसवून हव्या तशा मंजुऱ्या दिल्याचा ठपका चौकशी समितीनं ठेवलाय.
निवृत्तीआधीच्या शेवटच्या महिन्यात विश्वास पाटील यांनी 137 प्रकल्पांना अतिवेगानं मंजुऱ्या दिल्या.
त्यातील 33 प्रकरणात नियमबाह्यता आढळून आल्याचं चौकशी समितीनं स्पष्ट केलंय.

LATEST VIDEOS

LiveTV