मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी धुक्याचं साम्राज्य

09 Dec 2017 09:27 PM

आज अख्खा दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये दाट धुक्यानं आसमंत व्यापून टाकला होता. या धुक्यानं मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या मार्गातही अडथळा निर्माण केला.
या धुक्यामुळे सकाळी अनेक लोकल लेट झाल्या. लोकल लेट झाल्याने एक्स्प्रेस रखडल्या. आणि त्या एक्स्प्रेसला प्राधान्य दिल्याने लोकल आणखी लेट झाल्या. या सगळ्याचा परिणाम लोकलच्या वाहतुकीवर झाला आणि अखेरीस प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला.
वाशिंदमध्ये प्रवाशांनी रेल रोको करत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. पण याच आंदोलनामुळे गाड्या आणखी रखडल्या. फक्त धुक्यामुळे सुरु झालेली ही अडथळ्यांची शर्यत अगदी दुपारपर्यंत सुरु होती.

LATEST VIDEOS

LiveTV