माझा कट्टा : काँग्रेस खासदार राजीव सातव आणि राजकीय विश्लेषक सुधींद्र कुलकर्णींशी गप्पा

16 Dec 2017 11:57 PM

तब्बल 13 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली. दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात सोनिया आणि मनमोहन यांनी आशीर्वादासोबतच मार्गदर्शनही केलं. यावेळी राहुल यांनी आपल्या पहिल्याच अध्यक्षीय भाषणात मोदींवर निशाणा साधला. भाजप देश तोडण्याचं राजकारण करतं, आपण देश जोडण्याचं राजकारण करुयात असं राहुल म्हणाले. याशिवाय भाजपच्या हिंसक आणि विद्वेशी राजकारणानं देशाच्या मूलभूत गाभ्याला धक्का लावल्याचा आरोपही त्यांनी केला. तर राहुल गांधी यांच्यावर झालेल्या व्यक्तिगत टीकेनं त्यांना बळकट केलं. ते काँग्रेसला आणि देशाला योग्य दिशेनं घेऊन जातील असा विश्वास सोनियांनी व्यक्त केला. यानिमित्त काँग्रेसचे खासदार राजीव सातव आणि राजकीय विश्लेषक सुधींद्र कुलकर्णींशी गप्पा. तसंच मोदींच्या हिंदुत्ववादी राजकारणाचाही त्यांनी समाचार घेतला. आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठासमोर प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वढेरा उपस्थित होते. तसंच देशभरातून आलेले कार्यकर्ते आणि नेत्यांनी आज काँग्रेस मुख्यालय गजबजून गेलं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV