माझा कट्टा : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत दिलखुलास गप्पा

11 Nov 2017 10:39 PM

बॉलिवूडची ‘उलाला गर्ल’ अशी तिची ओळख असली, तरी ‘डर्टी पिक्चर’शिवाय परीणिता, पा, इश्किया, कहानी अशा अनेक चित्रपटात बहुरंगी व्यक्तिरेखा अभिनेत्री विद्या बालनने साकारल्या आहेत. ‘माझा कट्टा’वर गप्पा मारताना विद्याने बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच होत असल्याची खंत व्यक्त केली. शनिवारी रात्री 9 वाजता विद्या बालनसोबतच्या ‘माझा कट्टा’ चं ‘एबीपी माझा’वर प्रक्षेपण होईल.

बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच होतं. एखादी भूमिका किंवा मोठा ब्रेक हवा असेल, तर काही निर्माते नवोदितांना ‘कॉम्प्रोमाईझ’ करण्यासाठी सांगतात, असं विद्याने सांगितलं. वैयक्तिक आयुष्यात आपल्याला असा अनुभव आला नसल्याचं ती म्हणाली. मुलींना पुरुषांच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी काही सल्ला देण्याऐवजी पुरुषांनीच मर्यादेत रहावं, आपली दृष्टी बदलावी, असं विद्याने सांगितलं.

LATEST VIDEOS

LiveTV