विशेष चर्चा : कुलभूषण जाधव यांना न्याय मिळणार का?

25 Dec 2017 03:54 PM

कुलभूषण यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पाकिस्तानकडून केवळ अर्धा तासांचा अवधी देण्यात आला. यावेळी भारताचे उप-उच्चायुक्त जे पी सिंह सुद्धा उपस्थित होते.

मानवतेच्या दृष्टीकोनातून कुलभूषण यांना आई आणि पत्नीला भेटण्यास परवानगी दिल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले होते. या भेटीबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी अधिकृतरित्या सांगितले होते. त्यानंतर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांची आई आणि पत्नीला यासंदर्भात माहिती दिली.

कुलभूषणच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची हमी भारताने पाकिस्तानकडून घेतली आहे.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेने बलुचिस्तानच्या सीमेवरुन 3 मार्च 2016 रोजी अटक केली होती. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर चाललेल्या खटल्यात त्यांना रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली.

LATEST VIDEOS

LiveTV