माझा विशेष : काँग्रेस पापमुक्त होतेय?

22 Dec 2017 11:54 PM

टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यावर सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दिलेल्या निर्णयानं केंद्राची छी थू झाली असताना आता मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानं फडणवीस सरकार तोंडावर आपटलंय. आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांची चौकशी करण्यास राज्यपालांनी सीबीआयला दिलेली परवानगी मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे चव्हाणांचा आदर्शमधून सहीसलामत बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झालाय. अशोक चव्हाणांवर झालेले सर्व आरोप हे राजकीय सूडबुद्धीतून होते. असं म्हणत आता विरोधक सुद्धा आक्रमक झालेयत ... इतकच नव्हे तर राज्यपालांनी खटला चालवण्याचे दिलेले आदेशही राजकीय हेतूनं प्रेरीत असल्याचा आरोप करत आथा आता विरोधकांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. आता या प्रकरणात काय खरं काय खोटं याची चर्चा होईलच मात्र सलग दोन दिवस आणि दोन मोठ्या प्रकरणी दिलासा..काँग्रेस पापमुक्त होतेय का असा प्रश्नही अनेकांना पडला असेल

LATEST VIDEOS

LiveTV